शहरात प्रथमच हनुमान कथेचे आयोजन १० ते १२ एप्रिल रोजी होणार कथा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्था आणि समन्वय परिवारातर्फे दि.१० ते १२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ७ प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या पावन अमृतवाणीद्वारे प्रथमच श्री हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष भिकमचंद मल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, जनकल्याणच्या भावनेने तीन दिवस ही कथा चालणार आहे. या कथेचे मुख्य यजमान दिलीप बद्रीनारायण सोनी हे आहेत. हनुमान हे भगवान शंकराचे अवतार आणि श्रीरामाचे असीम भक्त असुन  ही कथाशक्ती आणि बुद्धीमत्तेची कथा आहे. हनुमान हे कलीयुगातील संकटमोचक मानले जातात. हनुमान चालीसा ही मनाला सशक्त करण्यासाठी चमत्कारिक पाठ आहे. प्रभू रामाच्या सेवेत विविध अवतार घेऊन लंकादहन, संजीवनी बूटी आणणे आणि लक्ष्मण प्राण रक्षासाठीचे चमत्कार यावरून प्रभू रामचंद्र यांच्यावरील भक्ती रामायणात आढळून येते. अशी सर्वगुणसंपन्न कथा प्रथमच शहरात तापडिया कासलीवाल प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. 
या हनुमान कथेला सर्व समाजातील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री महेश वरिष्ठ नागरिक संस्था आणि समन्वय परीवाराच्या वतीने अध्यक्ष भिकमचंद मल, दिलीप सोनी, सीए मदनलाल जाजू, राधेश्याम करवा, अ‍ॅड. ओमप्रकाश साबू, अ‍ॅड. अनिल सोनी, बी. एन. राठी, अ‍ॅड. सोमनाथ लढ्ढा, गणेश दरक, सुनील मालाणी, राजेंद्र राठी, रेखा राठी, संगीता चेचाणी, रमेश धूत, गोपाल अजमेरा, ओमप्रकाश काबरा, सुभाष लाहोटी, पद्मा तापडिया, सीए सत्यनारायण जाजू, चंद्रप्रकाश साबू, जगदिश सारडा, शिवप्रसाद तोतला, पंडित विजयकुमार पल्लोड, संजय प्रेमराज मंत्री, भुषण मालपाणी, निखील करवा, सीए कृष्णा राठी, रमेशचंद्र जाजू, अर्चना भट्टड, स्मिता सोनी आदी उपस्थित होते.